पनवेल : रामप्रहर वृत्त
बहुजनांचे, दलितांचे नेते आणि पनवेल नगर परिषदेचे माजी नगरसेवक दिवंगत एम. एस. जाधव यांच्या पुण्यतिथीनिमित्त पनवेल तालुक्यात विविध सामजिक उपक्रम राबविण्यात आले. त्याअंतर्गत नेरे येथील स्नेहकुंज वृद्धाश्रम, सांगटोली येथील जना धर्मा आधारगृह आणि सांगटोली येथील आदिवासी बांधवांना अन्नदान, खाऊवाटप आणि गोरगरिबांना ब्लँकेट वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नेरे येथे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ झाला. या वेळी भाजपचे ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, भाजप नेते राजेश पाटील, उदय म्हस्कर, सरपंच योगिता पाटील, ग्रामपंचायत सदस्य पुष्पा म्हस्कर, माजी सदस्य हिराबाई केणी, महिला मोर्चा सरचिटणीस प्रिया वाघमारे, नितीन जोशी, संगीता जोशी, शैलेश जाधव, प्रगती जाधव, ग्रामपंचायत सदस्य प्राची अमित जाधव, वनिता मोहिते, अपर्णा मोहिते, सानिका मोहिते आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.