पनवेल : रामप्रहर वृत्त
वैद्यकीय शिक्षणासाठी पनवेल येथील जिज्ञासा कडू हिला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. मदतीचा धनादेश लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते जिज्ञासाला सुपूर्द करण्यात आला.
सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रात गेल्या तीन दशकपेक्षा जास्त वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणार्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन स्वतः च्या पायावर उभे केले जाते. जिज्ञासाने एमबीबीएस शिक्षण पूर्ण केले असून ती पुढील वैद्यकीय शिक्षण सांगलीमधील प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अॅण्ड रिसर्च येथे मास्टर ऑफ सर्जरी हे शिक्षण घेणार आहे. त्यासाठी तिला आर्थिक मदतीची आवश्यकता होती. त्यानुसार तिला मदत करण्यात आली असून मदतीचा धनादेश लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जिज्ञासाचे अभिनंदन करून तिला पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी तिचे वडील ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, आई भारती कडू, अॅड. परेश गायकवाड, मंडळाचे व्यवस्थापक अनिल कोळी उपस्थित होते.
Check Also
खारघरमध्ये आरोग्य तपासणी शिबिर
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थितीखारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त सेक्टर 20 मधील हावरे …