Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आधारकार्ड आणि आरोग्य विमा शिबिराचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

नवीन पनवेलमध्ये आधारकार्ड शिबिर आणि आदित्य बिर्ला आरोग्य विमा शिबिराचे 15 ते 22 मार्चदरम्यान आयोजन करण्यात आले असून या शिबिराचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी झाले. या वेळी त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत यांच्या सौजन्याने नवीन पनवेल सेक्टर 15मध्ये रेल्वे स्टेशनसमोर आधारकार्ड शिबिर आणि आदित्य बिर्ला आरोग्य विमा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नवीन आधारकार्ड आणि आधारकार्डमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत. याशिवाय 18 ते 65 वर्ष वयोगटातील नागरिकांना अवघे 549 रुपये भरून 10 लाख रुपयांचा आरोग्य विमा काढण्यात येणार आहे.
शिबिराच्या उद्घाटन समारंभास भाजपचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, माजी उपमहापौर व जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, चिटणीस ब्रिजेश पटेल, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे, युवा नेते प्रतिक बहिरा, कामगार नेते रवी नाईक, कमलाकर घरत, जयराम मुंबईकर, किशोर मोरे, गुलाब थवई, सरोज मोरे, सुजाता पाटील, मेघा धमाल, प्रभा सिन्हा, प्रतिक पाटील, अर्चित घरत, इंडियन पोस्ट बँकेचे मॅनेजर सिद्धार्थ मुखर्जी, कल्याणी कुंभार, संकेत कांबळे आदी
उपस्थित होते.
या वेळी माजी उपमहापौर चारुशीला घरत यांनी 15 ते 22 मार्चदरम्यान आयोजित केलेल्या या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

Check Also

दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षम करण्यासाठी आमची तळमळ -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्ततळागाळात दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षमपणे सामोरे जायला पाहिजे ही आमची तळमळ असते, …

Leave a Reply