Breaking News

खारघरमध्ये आरोग्य तपासणी शिबिर

  • आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती
    खारघर : रामप्रहर वृत्त
    खारघरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त सेक्टर 20 मधील हावरे स्पेडर ग्लोरी क्लब हाऊसमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी (दि.16) करण्यात आले होते. या शिबिराला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजासमोर आदर्श ठेवण्याचे काम झाले असल्याचे गौरोद्गार काढले तसेच त्यांनी खारघर परिसराचा विकास चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन उपस्थित
    नागरिकांना केले.
    जागतिक महिला दिनाचे औचित्यसाधून भारतीय जनता पक्ष आणि प्रभाग क्रमांक 4च्या उपाध्यक्षा झुमा चक्रवर्ती यांच्या आयोजनातून मोफत हेल्थ चेकअप आणि रक्तदान शिबिर अमृतवेल आयुर्वेद पंचकर्म सेंटरच्या डॉ.ज्योती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.
    या शिबिराला आमदार प्रशांत ठाकूर यांनी शिबिराला भेट देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच महिला दिनानिमित्त फक्त महिलांसाठीच नाही तर सर्व नागरीकांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल आयोजकाचे कौतुक केले. या शिबिराला शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून यात मध्ये कास्य थाली फूट मसाज, 0 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांशाठी सुवर्णप्राशन, त्वरीत वेदना निवारण शिबिर, हाडांची तपासणी, दंत तपासणी करण्यात आली.
    या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, दिलीप जाधव, आयोजक प्रभाग क्रमांक 4च्या उपाध्यक्षा झुमा चक्रवर्ती, युवा मोर्चाचे खारघर शहर सचिव आदित्य हातगे, चेअरमन शिवम सिंग, सतीश सहस्रबुद्धे, प्रदीप भट यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Check Also

राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या पनवेल महापालिकेला प्रशस्तीपत्र प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या …

Leave a Reply