तळोजा : रामप्रहर वृत्त
तळोजा मजकूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा पहिला वर्धापन दिन रविवारी (दि.16) मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात साजरा झाला. या सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत दर्शन घेतले.
रायगडमधील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य मंदिर तळोजा मजकूर येथे उभारण्यात आले आहे. या मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यात मुर्ती अभिषेक, पुजन तसेच शिवकिर्तनकार ह.भ.प. संतोष महाराज सते यांचे किर्तन झाले. वर्धापन दिनानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंदिराला भेट देत दर्शन घेतले.
या वेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक हरेश केणी, सरपंच संतोष पाटील, निर्दोष केणी, संतोष पाटील, सुनील पाटील आदी उपस्थित होते.
Check Also
बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट
चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …
RamPrahar – The Panvel Daily Paper