मुरूड : प्रतिनिधी
पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मुरूडमध्ये सध्या सी-गल पक्ष्यांचे थवे दिसत आहेत. या पक्ष्यांच्या आगमनाने समुद्रकिनार्यांचे सौंदर्य अधिकच खुलल्याचे चित्र आहे.
ऑस्ट्रेलिया येथून मोठे अंतर पार करून थंडीच्या दिवसांत सी-गल पक्षी दरवर्षी मुरूड समुद्रकिनारी येत असतात. हा एक समुद्री पक्षी असून ते थव्यामध्ये राहतात. या पक्षांचा रंग पांढरा असतो. पंखाच्या कडा काळ्या व गडद असतात, तर चोच पिवळ्या रंगाची व समोर वाकलेली असते. मासे, गांडूळ व कीटक हे त्यांचे आवडते खाद्य.
साधारतः ऑक्टोबर महिन्याच्या दुसर्या आठवड्यात सी-गल पक्षी मुरूड समुद्रकिनारी पहावयास मिळतात. यंदाही या पक्षाचे आगमन मोठ्या संख्येने झाल्याने संपूर्ण किनारा पक्षांच्या सफेद रंगाने न्हाऊन निघाला आहे. मुरूड शहराला अडीच किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. या किनारी विविध भागांत सी गलचे थवे दिसत आहेत.
सी-गल पक्षी दिसावयास सुंदर असल्याने असंख्य पर्यटक त्यांना पाहण्यासाठी गर्दी करतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने हे पक्षी मुरूड किनारी आले असल्याने पर्यटकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
Check Also
पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे
आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …