Breaking News

सायना, सिंधू, समीर पराभूत

वुहान : वृत्तसंस्था

आशियाई  बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत तब्बल 54 वर्षांनी विजेतेपद मिळवण्याचे भारतीय बॅडमिंटनपटूंचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. महिलांमध्ये पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल; तर पुरुषांमध्ये समीर वर्मा उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्याने भारताला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.

महिलांच्या गटात जपानच्या तृतीय मानांकित अकानी यामागुचीने संघर्षपूर्ण सामन्यात सातव्या मानांकित सायनाला तीन गेममध्ये पराभूत केले. एक तास नऊ मिनिटे चाललेल्या या सामन्यात यामागुचीने सायनाला 21-13, 21-23, 21-16 असे नमवले.

चीनच्या बिगरमानांकित काई यानयानने ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या चौथ्या मानांकित सिंधूला 21-19, 21-19 असे पराभूत करीत धक्कादायक विजयाची नोंद केली. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत सहाव्या स्थानी असणार्‍या सिंधूला नेस्तनाबूत करण्यासाठी यानयानला फक्त 31 मिनिटांचा अवधी लागला.

पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चीनच्या दुसर्‍या मानांकित शी युकीने समीरला 21-10, 21-12 अशा सरळ दोन गेममध्ये धूळ चारली. समीरव्यतिरिक्त एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या किदम्बी श्रीकांतचे आव्हान याआधी पहिल्या फेरीतच संपुष्टात आले होते.

Check Also

पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …

Leave a Reply