अहमदाबाद : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून प्रेरणा घेऊन गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी ही माहिती दिली.
मंत्रिमंडळाच्या या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला म्हणाले की, गुजरातमध्ये समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्यासाठी समितीचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असतील आणि त्यात तीन ते चार सदस्य असतील.
Check Also
पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे
आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …