Tuesday , March 21 2023
Breaking News

भाजपची ताकद अधिक वाढवा : अ‍ॅड. माधवी नाईक

पनवेल : रामप्रहर वृत्त

केंद्र व राज्य सरकारने महिलांच्या स्वयंपूर्णतेसाठी विविध योजना आणल्या. त्यामुळे सरकारप्रति महिलांचे समर्थन वाढल्याचे लोकसभा निवडणुकीतून दिसून आले. हे समर्थन भाजपकडे आणून पक्षाची ताकद अधिक वाढवा, असे आवाहन महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. माधवी नाईक यांनी केले. त्या जिल्हा बैठकीत बोलत होत्या. भाजप रायगड जिल्हा महिला मोर्चाची बैठक शनिवारी (दि. 6) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या पनवेल येथील सभागृहात महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष अ‍ॅड. माधवी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या वेळी भाजप सदस्य नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला.

या बैठकीस पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कल्पना दास्ताने, जिल्हाध्यक्ष कल्पना राऊत, सरचिटणीस अजया जोखाडिया, पनवेल तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहराध्यक्ष मुग्धा लोंढे, माजी उपमहापौर चारुशीला घरत यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा येण्यात महिलांचाही मोठा वाटा आहे. महिलांमुळे मतदानाचा टक्का वाढल्याने खुद्द पंतप्रधान मोदींनी महिलावर्गाचे आभार मानले असे सांगून, लोकांनी ठरविले आहे की त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत सरकार हवे आहे. आता आपली जबाबदारी आहे ती म्हणजे आपण जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे, असे अ‍ॅड. नाईक म्हणाल्या.

आपल्याला ज्यांनी सुरक्षित, स्वावलंबी व सन्मानाचे आयुष्य दिले त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्व महिला-भगिनींनी राखी बांधायची आहे. यंदाचे रक्षाबंधन आपण अनोख्या पद्धतीने साजरे करू या, अशी साद त्यांनी उपस्थित महिलांना या वेळी घातली. या वेळी सोशल मीडिया कोकण प्रमुख अभिजीत पेडणेकर, जिल्हा संयोजक विशाल शिंदे यांनी सोशल मीडियाबाबत, तर महिला मोर्चा प्रदेश चिटणीस नीलम गोंधळी यांनी रक्षाबंधन पर्व व प्रज्वल योजनेबाबत मार्गदर्शन केले.

पनवेल विधानसभा संयोजिका म्हणून महापौर डॉ. कविता चौतमोल, सहसंयोजिकापदी माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेविका चारुशीला घरत, तर उरण विधानसभा संयोजिका म्हणून नगराध्यक्ष सायली म्हात्रे व सहसंयोजिकापदी महिला मोर्चा पनवेल तालुकाध्यक्ष व पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल त्यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

– झाशीच्या राणीप्रमाणे कार्यरत

राहा : लोकनेते रामशेठ ठाकूर

आपल्या भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित महिलावर्गाला उद्देशून म्हणाले की, ज्याप्रमाणे देशासाठी झाशीची राणी लढली त्याप्रमाणे तुम्ही कार्यरत राहून पक्ष वाढवा. महिलांना संधी मिळाल्यास त्या तिचे सोने करतात. म्हणूनच त्यांनी सदस्यपदावर समाधान न मानता बूथ कमिटी अध्यक्ष व शक्ती केंद्र प्रमुख म्हणून काम करण्याचीही जबाबदारी घ्यावी. आपल्याला पक्ष सदस्य, तसेच

मतदार नोंदणी करायची आहे. लोकसभा निवडणुकीत पनवेलमधून आपल्याला 54 हजार

मतांची आघाडी मिळाली. महिलांनी पूर्ण योगदान दिल्यास आमदार प्रशांत ठाकूर लाखाहून अधिक मतांनी विजयी होतील.

– लोकसभा निवडणुकीत भाजपची घोडदौड कायम राहिली. तशाचप्रकारे विधानसभा निवडणुकीतही आपल्याला यश मिळवायचे असून, त्यात महिलांचा वाटा मोठा असला पाहिजे.

-कल्पना राऊत, अध्यक्ष

रायगड जिल्हा महिला मोर्चा

– देशात नरेंद्र व राज्यात देवेंद्र ही संकल्पना आपल्याला पुन्हा सत्यात उतरवायची आहे. त्याचप्रमाणे पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर यांना पुन्हा मोठ्या मताधिक्क्याने विजयी करायचे आहे.

-रत्नप्रभा घरत, अध्यक्ष

पनवेल तालुका महिला मोर्चा

Check Also

शासकीय कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे!

सरकासोबत चर्चा यशस्वी मुंबई : प्रतिनिधी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांचा संप …

Leave a Reply