मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष, अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून सुप्रसिद्ध असलेले अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 22) विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभीष्टचिंतन केले.
माणसे जपणारे दिलदार नेते अरुणशेठ भगत गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांचे अत्यंत जवळचे ते सहकारी असून समाजातील तळागाळात त्यांचा परिचय आहे. लोकांच्या सुखदुःखात धावून जाणे हा त्यांचा आत्मा आहे. त्यामुळे अरुणशेठ भगत यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला. लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, शहराध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस नितीन पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश चिटणीस मन्सूर पटेल, कामोठे भाजपचे अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी अभीष्टचिंतन करून निरोगी व उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसानिमित्त गव्हाण कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये अभीष्टचिंतन सोहळा, भानघर वृद्धाश्रमास भेट, खेरणे येथे विकासकामांचे उद्घाटन, खांदा गाव येथील ट्राय सिटी बिल्डिंग ऑफिसचे उद्घाटन, कुंडेवहाळ येथे विकासकामांचे उद्घाटन आणि शेलघर जि. प. शाळा येथे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून कम्प्युटर लॅबचे उद्घाटन आदी विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.