Breaking News

रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 : पनवेलच्या प्रसाद ढवळेची महाराष्ट्र संघात निवड

पनवेल : रामप्रहर वृत्त

रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मार्फत (राष्ट्रीय ट्रायल) म्हणजे राष्ट्रीय निवड चाचणी यामध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेलचा रहिवासी प्रसाद महेश ढवळे याची महाराष्ट्र संघात पाचव्यांदा निवड झाली आहे. ही चॅम्पियनशीप 10 ते 22 डिसेंबर 2022 रोजी बेंगळूरू येथे होणार आहे.

प्रसाद महेश ढवळे हा 2021 ला महाराष्ट्र संघाचा कर्णधार होता. बेंगळूरूमध्ये होणार्‍या रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया  तर्फे 60वी राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेत प्रसाद ढवळेची निवड करण्यात आली आहे तसेच 2019मध्ये प्रसाद महेश ढवळे यांना रायगड भूषणने गौरविण्यात आले आहे. स्केटिंगमध्ये गेले अनेक वर्षांपासून प्रसाद हा रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आहे.

प्रसादचे विविध स्तरातून अभिनंदन होत असून त्याचा पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा मिळत आहेत.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply