पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर विद्यालय इंग्रजी माध्यमात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या वेळी झालेल्या विज्ञान प्रदर्शनात 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांनी अनेक कल्पक वैज्ञानिक प्रकल्प सादर केले. या विज्ञान प्रदर्शनासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉप्लेक्सचे फाउंडर मेंबर (शक्ती केंद्रप्रमुख) जगदीश घरत हे लाभले होते. प्रदर्शनात ॠत्विक पाटील आणि ईशान भोईर इ. 8वी, धु्रवल म्हात्रे इ. 9वी, शिवम पाटील इ. 9वी, रूद्र जाधव इ. 7 वी, देवयानी चोनकर, राजरत्न निकम, वेदिका भ्ाुयार इ. 6वी यांचे प्रकल्प वैशिष्टपूर्ण ठरले. या वेळी मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी सांगितले की, विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळतो. तसेच भविष्यातील वैज्ञानिक घडविण्यासाठी अशा शालेय उपक्रमांचा निश्चित फायदा होतो, तसेच विद्यार्थ्यांची प्रशंसा केली. या वेळी इंग्रजी प्राथमिक मुख्याध्यापिका निलिमा शिंदे, मराठी प्राथमिक मुख्याध्यापक सुभाष मानकर, ज्युनिअर कॉलेज पर्यवेक्षिक प्रशांत मोरे, इंग्रजी माध्यमिक पर्यवेक्षिका निरजा अदुरी, इंग्रजी पूर्व प्राथमिक पर्यवेक्षिका संध्या अय्यर, तसेच सर्व विज्ञान शिक्षक उपस्थित होते. सर्व प्रकल्पांचे परिक्षण ज्युनिअर कॉलेज प्राध्यापक सचिन घरत आणि गायकवाड यांनी केले. प्रदर्शनात एकूण 52 प्रकल्प सादर करण्यात आले.