Breaking News

उसर्लीत लाडक्या बहिणींचा मेळावा

सरकार महिलांच्या हितासाठी समर्पित -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत
केंद्र आणि राज्यातील महायुती सरकार पूर्णपणे सर्वसामान्यांच्या आणि महिलांच्या हितासाठी समर्पित आहे. सध्या सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून येणार्‍या काळातही ती सुरू राहणार आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी उसर्ली खुर्द येथे लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात केले.
पनवेल तालुक्यातील उसर्ली खुर्दमधील सुख-शांतीनगर येथे लाडकी बहीण मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित महिलांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देत 7 फेबु्रवारीला होणार्‍या मतदानावेळी कमळ निशाणीसमोरील बटन दाबून पळस्पे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार हर्षदा घरत आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार राजेंद्र पाटील यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
या मेळाव्याला भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जिल्हा परिषद उमेदवार हर्षदा घरत, पंचायत समिती उमेदवार राजेंद्र पाटील, ऐश्वर्या जाधव, प्रतिभा जाधव, अमृता माळी, प्रणया पाटील, आरती गावणांग, अश्विनी पवार, संस्कृती चाळके, सुप्रिया जाधव, अनुजा आलोजी, रोहिणी पिसाळ, सुनिता दळवी, वर्षा पाटील, निकिता कोळी, रामेश्वरी नरूटे, रोहिणी मोरे, रेश्मा माळवे, भाग्यश्री खाटपे, प्रणाली कुलपे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने माता-भगिनी उपस्थित होत्या. भाजप-महायुतीचे सरकार महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी कटिबद्ध असून विकासकामांचा हा वेग कायम राखण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना पाठबळ देणे आवश्यक आहे, असे आवाहन आमदार ठाकूर यांनी केलेे.
या वेळी महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळ घेण्यात आले होते, ज्याला परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Check Also

पनवेलमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजप महायुतीचा ऐतिहासिक विजय

शेकापचा सुपडा साफ! पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत …

Leave a Reply