मोहोपाडा : प्रतिनिधी
ग्रामीण भागात क्रिकेटचा हंगाम सुरू झाला,आणि गवताला आग लागण्यास सुरूवात झाली. त्यामुळे अनेक जीव आगीत होरपळून मृत्यू झाल्याचे दिसत आहे. पाऊस पूर्णपणे थांबला असून जमीन सुकली आहे. याचाच फायदा घेत आगी लावण्यात येत आहे. यामुळे निसर्गाची हानी होतच आहे, पण जन जनावरे, गायी, बैल म्हशी यांच्या सुक्याचार्याची राख रांगोळी होत आहे. बिळात वास्तव्य करणारे भूचर प्राणी, पक्षी यांची हत्त्या केली जाते. शेतकरी, निसर्गप्रेमी, पर्यावरप्रेमींनी लावलेल्या झाडांची राख होत आहे. ही आग भुई ससा पकडणे, अन्य प्राण्यांची शिकार करणे, भरावसाठी माती चोरून नेणे, क्रिकेट प्रेमी खेळाचे मैदान तयार करण्यासाठी करतात,तर गावच शहरी करण होत असताना आजूबाजूचे बांधकाम व्यावसायिक जागा उपलब्ध व्हावी म्हणून असे प्रकार करत असावेत, अशी चर्चा सुरू आहे. याला वेळीच आला न घातल्यास निसर्गाची हानी होईलच, पण जीवांची हत्या होण्याचे प्रमाण वाढत जाईल.