Breaking News

रुग्णवाहिकाचालकांचा मृत्यूसोबत प्रवास

नवी मुंबई : प्रतिनिधी

कोरोना सध्या दुसर्‍या लाटेत संवेदनशील टप्प्यावर आहे. या काळात कोरोनायोद्धा म्हणून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस लढा देत आहेत. या सर्वांबरोबर जीवनवाहिनी ठरलेल्या नवी मुंबई परिसरातील शववाहिका तसेच रुग्णवाहिका अविरतपणे  वर्षभरापासून रुग्णसेवा देत आहेत. लाखोहुन अधिक कोरोना रुग्णांची उन्ह, पाऊस व थंडीत या तिन्ही ऋतूत रुग्णसेवा देणार्‍या एकाही रुग्णवाहिका चालकांला अद्याप तरी कोरोनाने घेरले नसल्याने त्यांची सेवा आजही खंडित न होता अखंड चालूच आहे.

कोरोना संशयिताना तपासणीकरीता नेण्यापासून ते अंत्यविधीसाठी स्मशान गाठणार्‍या शववाहिकेबरोबर रुग्णवाहिकाचालक वेळीच रुग्णाचे नातेवाईक बनत आपले कार्य चोखपणे बजावत आहेत. त्यात अनेक रुग्ण बरे होऊन जाताना त्यांच्या चेहर्‍यावरील स्मितहास्य पाहून जणू काही रुग्णांना देवाकडून  गॉड गिफ्टच मिळलेल्याचे भाव पाहण्यास मिळतात. कधी ऑक्सिजन व बेड अभावी रुग्णांचा रुग्णवाहिकेतच तडफडून मृत्यू पहावयास मिळते. सध्या अशा घटना रुग्णवाहिका चालकांना सर्रास पहावयास मिळत आहेत, मात्र त्यातही न डगमगता रुग्णवाहिका चालक आपली जबाबदारी जोख बाजावत नातेवाइकांना वेळप्रसंगी धीर देण्याचे काम ही त्यांना करावे लागते.

जगभरात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. दिवसेंदिवस अनेक रुग्ण कोरोनाच्या छायेत जात आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातदेखील कोरोना संसर्गात वाढ झाली आहे. दररोज पाचशेच्या पुढील आकडा गाठला जात आहे. वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचार्‍यांच्या खांद्याला खांदा लावून रुग्णवाहिकाचालक काम करत आहेत. शहरात कोविड रुग्ण तसेच नॉनकोविड रुग्णांसाठी रुग्णवाहिकेचा शहरवासीयांना मोठा आधार मिळत आहे. पालिका क्षेत्रातील कोरोना संशयिताना तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन येणे, बाधित रुग्णांना रुग्णालयात पोहचवणे, मृत रुग्णाची स्मशानभूमीपर्यंत पाठवणी करणे.

कोरोना रुग्णांना घेण्यासाठी जाताना त्यांचे नातेवाईकदेखील जवळ येत नाही. त्यावेळी सगळं रुग्णवाहिका चालकांनाच करावे लागते. कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने रुग्णवाहिकाची मागणी वाढली आहे. त्यानुसार रुग्ण वाहिका चालकांना स्वतःची सुरक्षा करत सुरक्षा मास्क, सैनिटायझर, पीपीई किटचा वापर करावा लागतो. नवी मुंबईत पालिकेच्या जवळजवळ 80 रुग्णवाहिका  तर खाजगी 130 रुग्णवाहिका अहोरात्र सेवा देत आहेत.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply