Breaking News

नाशिक येथे रोईंगपटूवर चोरट्यांचा प्राणघातक हल्ला

नाशिक ः प्रतिनिधी

राष्ट्रीय रोईंगपटू निखिल सोनवणे याच्यावर चोरट्यांनी काल रात्री प्राणघातक हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या निखिलवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे निखिलला दोन दिवसांवर आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेला मुकावे लागणार आहे.

राष्ट्रीय स्तरावरील रोईंगपटू निखिल मंगळवारी रात्री सराव करून चोपडा लॉन्स येथून जात होता. त्याचवेळी तेथील पेट्रोलपंपासमोर चोरट्यांनी त्याला अडवले, मात्र त्याच्याकडे काहीही मिळाले नाही. याच रागातून त्यांनी त्याच्यावर कोयता आणि चाकूने हल्ला केला. त्यानंतर ते घटनास्थळावरून पसार झाले.

या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, या हल्ल्यात जखमी झालेल्या निखिलला दोन दिवसांवर आलेल्या राष्ट्रीय स्पर्धेला मुकावे लागणार आहे.

पुण्यातील नाशिक फाट्याजवळ आर्मी बोटिंग क्लब येथे 17 ते 19 मेदरम्यान राज्यस्तरीय रोईंग स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी निखिल कसून सराव करीत होता. याआधीही त्याने राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदकासह रौप्य पदकाची कमाई केली आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply