Breaking News

ठाण्यात कार खड्ड्यात उलटून एकाचा मृत्यू

कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, अग्निशमन दलाच्या जवानांची मदत

ठाणे ः प्रतिनिधी

ठाण्यात घोडबंदर रोड येथे ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात कार उलटून झालेल्या दुर्दैवी अपघातात एक प्रवासी ठार झाला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

काल पहाटे सव्वासहा वाजता घोडबंदर रोडजवळील मुल्लाबाग बस डेपोजवळ हा भीषण अपघात झाला. सचिन काकोडकर हे मारुती सुझुकी अर्टिका कारने नीलकंठ ग्रीन्सकडून घोडबंदर रोडकडे जात होते.

मुल्लाबाग बस डेपोजवळ इगल कन्स्ट्रक्शन कंपनीने ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी भलामोठा खड्डा खोदला आहे. मुल्लाबाग बस डेपोजवळ काकोडकर यांची कार येताच ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी खोदलेल्या या भल्यामोठ्या खड्ड्यात त्यांची कार पलटी झाली आणि कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. त्यामुळे काकोडकर गंभीर जखमी झाले.

प्रचंड मार लागल्याने ते कारमध्येच अडकून पडले. खड्ड्यात कार पलटी झाल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन एक इमर्जन्सी टेंडर आणि रेस्क्यू वाहनाच्या साहाय्याने ही कार खड्ड्यातून बाहेर काढली. त्यानंतर जखमी काकोडकर यांना बेथनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply