Breaking News

पनवेलकरांना ई-पास सक्तीचा

गणेशभक्तांमध्ये संताप

COVID e-Pass

कळंबोली : बातमीदार

गणेशोत्सवासाठी गावाला जाण्याचे नियोजन केले असताना अचानकपणे रायगडचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन पनवेलमधून रायगडच्या विविध तालुक्यात येणार्‍या गणेशभक्तांना ई-पास ची सक्ती केली आहे. या निर्णयामुळे रायगडच्या गणेश भक्तांमध्ये संतापाचे वातावरण  निर्माण झाले आहे. याबाबत शिवसेनेचे महाडचे आमदार भरत गोगावले यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता ते म्हणाले याबाबत मला काहीच माहिती नाही. या बाबतची माहिती मी पोलीस अधीक्षकांशी बोलून घेतो असे ते म्हणाले. त्यामुळे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी घेतलेला हा निर्णय परस्पर घेतला असल्याने गणेश भक्तांना वेठीस धरणारा असल्याचे पनवेलमधील गणेश भक्तांनी सांगितले आहे. पास आता काढणार केव्हा त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र घेणार कधी आणि गावाला जाणार कधी अशा विवंचनेत आता गणेशभक्त अडकलेला आहे. राज्य शासनाने घेतलेल्या या जाचक निर्णयाचा गणेश भक्तांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे.राज्य शासनामध्ये गणेश भक्तांना देण्यात येणार्‍या सोयी बाबत घेण्यात येणारे निर्णय वेळोवेळी बदलत जात असल्याने अनेकांनी संताप व्यक्त केलेला आहे. तरी पनवेलमधून रायगडच्या विविध तालुक्यात जाणार्‍या गणेशभक्तांना ई-पास  सक्ती करण्यात येऊ नये, अशी आता मागणी जोर धरू लागली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply