Breaking News

मिनी ऑलिम्पिकसाठी रायगड तायक्वांदो संघ रवाना

आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिल्या शुभेच्छा

पनवेल : रामप्रहर वृत्त  
महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी रायगड तायक्वांदो संघाची निवड झाली असून हा संघ स्पर्धेकरिता रवाना झाला. या संघाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या.
या संघात नुपूर पावगे, अपूर्वा देसाई, जयश्री गोसावी, अनुष्का लोखंडे, ऐश्वर्या गोरे, मयुरी खरात, ओमकार गिरे, गणेश शिंदे, भूषण गुंजाळ, रोहित सिनलकर यांचा समावेश असून ते वेगवेगळ्या गटातील स्पर्धेत सहभाग घेतील. याशिवाय तुषार सिनलकर (प्रशिक्षक), संजय भोईर (व्यवस्थापक), अमोल माळी (पंच), हेमंत कोळी (पंच) व अ‍ॅड. प्रज्ञा भगत (सहाय्यक अधिकारी) यांचीही निवड झाली आहे. सर्व खेळाडूंनी कठोर परिश्रम घेत राज्य तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत नेत्रदीपक यश संपादन केले होते. रायगड संघाला आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगरसेविका दर्शना भोईर तसेच जिल्हा सचिव सचिन माळी यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व राज्य क्रीडा व युवक संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ते 13 जानेवारीदरम्यान आठ शहरांमध्ये मिनी ऑलिम्पिक आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी राज्यातून सात हजारांहून अधिक खेळाडू 41 विविध खेळांमध्ये आपले कसब पणाला लावत आहेत.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply