Breaking News

बाल गिर्यारोहक शर्विका म्हात्रेेने केला ‘मोरोशीचा भैरवगड’ सर

रेवदंडा : प्रतिनिधी

अलिबागची बाल गिर्यारोहक शर्विका म्हात्रे हिने चढाईस अतिकठीण समजला जाणारा भैरवगड (ता. मुरबाड) रविवारी (दि. 29) सर  केला.

नाशिक येथील पॉईट ब्रेक अडवेंचर या गिर्यारोहक संस्थेने प्रसिध्द गिर्यारोहक जॉकी साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली  रविवारी ‘मोरोशीचा भैरवगड’ गिर्यारोहण मोहीम आयोजित केली होती. माळशेज घाटातील भैरवगड किल्ला सर करण्यासाठी अतिकठीण समजला जातो. सुरक्षेचे योग्य साहित्य आणि अनुभवी गिर्यारोहण पथकाशिवाय हा किल्ला सर करणे अवघड आहे.

अलिबागची हिरकणी बाल गिर्यारोहक शर्विका म्हात्रे हिने ‘मोरोशीचा भैरवगड’ सर करून अभिमानस्पद कामगिरीची नोंद केली आहे. शर्विकाने यापुर्वी  कलावंतीण सुळका, साल्वेर किल्ला, कळसुबाई शिखर आणि  गिरनार शिखरावर झेंडा फडकविला आहे.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply