महाड ः प्रतिनिधी
महाड शहरानजीक असलेल्या पी. जी. रिजेन्सी हॉटेल अँड रिसॉर्ट येथे काम करणार्या मॅनेजरने हॉटेल मालकला पाच लाखांचा चुना लावून पलायन केले. पी. जी. रिजेन्सी हॉटेल अँड रिसॉर्ट येथे मोहित सतीश बाली (रा. नाशिक) हा मॅनेजर म्हणून काम करीत होता. एप्रिल ते ऑक्टोबर 2022 यादरम्यान त्याने हॉटेलमध्ये येणार्या ग्राहकांकडून 5 लाख 87 हजार 08 रु. बिलाची रक्कम अदा झाली ती हॉटेलच्या बँक खात्यात न भरता आपल्याकडेच ठेवली. याप्रकरणी हॉटेलमालक प्रशांत कांतीलाल गुजर यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात बाली याच्याविरोधात तक्रार दाखल केली असून भादंवि. कलम 420/406प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.