नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शारदा चिटफंडप्रकरणी प. बंगालचे आयपीएस अधिकारी राजीव कुमार यांच्या अटकेवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने हटवली आहे. शुक्रवारी (दि. 17) या प्रकरणी सुनावणी देताना सुप्रीम कोर्टाने सांगितले की, सीबीआय आपले काम करू शकते, मात्र कोर्टाचा हा निर्णय सात दिवसांनंतर लागू होणार आहे. यादरम्यान राजीव कुमार कायदेशीर पावले उचलू शकतात. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दणका बसला आहे.
कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. सीबीआय त्यांना सात दिवसांनंतर अटक करू शकते. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की या सात दिवसांंत कुमार आपल्या जामिनासाठी कोर्टात अर्ज करू शकतात.