नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नेरूळ उड्डाणपूलावर शनिवारी साडेतीन चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात 19 वर्षीय अमन इर्शाद अन्सारी याचा मृत्यू झाला. दुचाकी घसरल्यावर मागून येणार्या अज्ञात वाहनाच्या खाली तो आला होता. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अमन अन्सारी हा वातानुकूलित यंत्राच्या दुरुस्तीचे काम करत असून शनिवारी दुपारी चारच्या सुमारास अमन अन्सारी हा खारघर येथील आपले काम आटोपून मुंबईच्या दिशेने तो आपल्या सहकार्या समवेत निघाला. नेरूळ येथील एल पी उड्डाण पुलावर चढताना एका खड्याला चुकवताना त्याच्या गाडीचा तोल गेला व गाडी घसरली. त्यात दोघेही खाली पडले.
वास्तविक अमन याने हेल्मेट घातले होते, मात्र त्याचा बेल्ट न लावल्याने तो घसरून पडताच त्याचे हेल्मेट त्याच्या डोक्यावरून निघून खाली पडले तेवढ्यात मागून येणार्या अज्ञात वाहन त्याच्या वरून गेले आणि तो जागीच गतप्राण झाला.
या अपघातास कारण असणारे वाहन निघून गेले, मात्र मागून येणारी वाहने थांबली. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात
करण्यात आली.
Check Also
रक्तसाठा अद्ययावत माहितीच्या मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष
रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर दंडात्मक कारवाई -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई : रामप्रहर …
RamPrahar – The Panvel Daily Paper