कर्जत : प्रतिनिधी
कर्जत विधानसभा मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्धार सभा 29 नोव्हेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत येथील पोलीस परेड मैदानावर होणार आहे. त्याआधी कर्जत येथे उभारण्यात आलेल्या पक्ष कार्यालयाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कर्जतमधील सभेला राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, कृषीमंत्री धनंजय मुंडे, महिला व बालकल्याण सभापती आदिती तटकरे आदी नेते उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी कर्जत येथील रेडीसन ब्लू या पंचतारांकित रिसॉर्टमध्ये राष्ट्रवादीचे दोन दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरास राज्यातील पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकार्यांची
उपस्थिती असणार आहे.
Check Also
बीसीटी विधी महाविद्यालयात पदवीदान सोहळा
मान्यवरांची लाभली उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील भागुबाई …