Breaking News

वैशाख पौर्णिमेनिमित्त नेरळमध्ये हनुमान उत्सव

कर्जत : नेरळ गावात अनेक दशकापासून वैशाख पौर्णिमेनिमित्त हनुमान उत्सव आयोजित केला जातो. पूर्वी त्यानिमित्त नेरळ गावात यात्रा भरविली जायची. दरम्यान, शनिवारी (दि. 18) हनुमान उत्सवानिमित्त पालखी सोहळा आयोजित केला होता. नेरळ गावातील कुंभार आळीत मारुती मंदिर आहे, तेथे  वैशाख पौर्णिमेनिमित्त उत्सव आयोजित केला होता. आजचे छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे म्हणजेच पूर्वीच्या नासके तळे येथे ही मारुतीरायाची मूर्ती स्थापित होती. पूर्वी येथे शेळ्यामेंढ्यांचे मलमूत्र टाकले जायचे आणि त्याच्या ढिगार्‍याखाली मारुतीरायाची मूर्ती सापडली, अशी आख्यायिकाही सांगितली जाते. येथे बुद्धपोर्णिमा अर्थात वैशाख पौर्णिमेला तेथे मोठी जत्रा भरायची. मंदिर उत्सव समितीतर्फे आजही येथे वैशाख पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. उत्सवानिमित्त नेरळकरांनी मंदिरात जाऊन मारुतीरायांचे दर्शन घेतले आणि पालखी मिरवणुकीत सहभाग नोंदविला.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply