माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खेलो युवा अंतर्गत भाजप युवा मोर्चा पनवेल मंडळाच्या वतीने 20 व 21 मे रोजी युवा वॉरियर्स फुटबॉल चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 4 वाजल्यापासून खेळली जाईल.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 50 हजार रुपये व चषक, द्वितीय पारितोषिक 25 हजार रुपये व चषक, तृतीय पारितोषिक 10 हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. याशिवाय बेस्ट प्लेअर, बेस्ट किपर व फेअर प्ले अॅवार्ड दिला जाईल.
अधिक माहितीसाठी अभिषेक भोपी (9820702043), देवांशू प्रभाळे (8433513540), रोहन माने (7021305998) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.