Breaking News

युवा वॉरियर्स फुटबॉल चषक स्पर्धा

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खेलो युवा अंतर्गत भाजप युवा मोर्चा पनवेल मंडळाच्या वतीने 20 व 21 मे रोजी युवा वॉरियर्स फुटबॉल चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 4 वाजल्यापासून खेळली जाईल.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 50 हजार रुपये व चषक, द्वितीय पारितोषिक 25 हजार रुपये व चषक, तृतीय पारितोषिक 10 हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. याशिवाय बेस्ट प्लेअर, बेस्ट किपर व फेअर प्ले अ‍ॅवार्ड दिला जाईल.
अधिक माहितीसाठी अभिषेक भोपी (9820702043), देवांशू प्रभाळे (8433513540), रोहन माने (7021305998) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply