Breaking News

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे विविध ठिकाणी वह्यांचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने भाजपचे खारघर तळोजा मंडळ उपाध्यक्ष शुभ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वह्यांचे वाटप भाजपचे तालुकाध्यक्ष तथा मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 27) करण्यात आले.
भाजप युवा मोर्चाचे खारघर तळोजा मंडळ उपाध्यक्ष शुभ पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्रात गेली तीन दशके उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे खारघर येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शुभ पाटील यांच्या वतीने दप्तरांचेही वाटप करण्यात आले.
या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यानंतर वह्यांचे वाटप केले तसेच शुभ पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, सोमनाथ पाटील, सचिन पाटील, पप्पू खामकर, विनोद खानावकर, वैभव पाटील, विनय राठोड, यश म्हात्रे, राकेश चौधरी, वाघमारे सर यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

पनवेल : श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमांद्वारे नेहमीच मदतीचा हात देण्यात येतो. त्याअंतर्गत पनवेल महापालिकेच्या लोकनेते दि. बा. पाटील विद्यालयात मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या वेळी भाजपचे पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, माजी नगरसेवक जगदीश गायकर, कविता पाटील, सपना पाटील, मुख्याध्यापीका अनुपमा डामरे, सरिता काकडे, वैशाली पाटील, वैशाली सोनावणे, चंद्रकांत वारगुडे, निलम देवळे, अर्चना माने, जयश्री रोडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

 

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply