मुंबई : प्रतिनिधी
सोशल मीडियावर सध्या 140 या अंकाने सुरुवात होणार्या अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन कॉल रिसीव्ह केल्यास आपल्या खात्यातील सर्व रक्कम काढली जाते, असा मेसेज व्हायरल होत आहे, मात्र या व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे महाराष्ट्र सायबर विभागाने स्पष्ट केले आहे. जोपर्यंत बँक अकाऊंट डिटेल्स, ओटीपी अथवा क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचे पूर्ण नंबर तसेच सीव्हीव्ही अथवा पिन नंबर शेअर करीत नाही तोपर्यंत आपल्या बँक खात्याला कसलेही नुकसान होऊ शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
जर 140ने सुरुवात होणार्या क्रमांकावरून फोन कॉल आला तर घाबरू नये वा पॅनिक होऊ नये. हे क्रमांक टेलिमार्केटिंगकरिता दिले गेलेले असतात, परंतु हेही लक्षात ठेवावे की अशा किंवा इतर कोणत्याही क्रमांकावरून फोन कॉल आल्यास व ओटीपीसह आपली वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स, डेबिट, क्रेडिट कार्ड डिटेल्स जर कोणी विचारत असेल तर आपण आपली कोणतीही वैयक्तिक माहिती, बँक खात्याची माहिती, डेबिट, क्रेडिट कार्डची माहिती देऊ नका किंवा पिन नंबर, ओटीपीची माहिती त्यांना दिली जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सायबर विभागाने केले आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …