Breaking News

गव्हाण विद्यालयातील गुणवंतांचा पत्रकार समितीकडून सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उलवे येथील उत्कर्ष पत्रकार समितीच्या वतीने करण्यात आला.
विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी व समन्वय समिती सदस्य अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात इयत्ता दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, गुलाब पुष्प, लेखणी व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
दहावीमधील जान्हवी घरत, श्वेता घाडगे, दीपक बचाटे तर बारावी परीक्षेमधील रीया नाईक, वेद पाटील, वर्षाली पाटील तसेच इयत्ता दहावीमधील 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त झालेल्या पुढील विद्यार्थ्यांचाही यात आरती शेजुळ, अन्वय गुळवे, रोहीत गुळवे, प्रथमेश कोरेकर, दीपिका माने, तृषा कोळी, क्षितिजा कांबळे, साक्षी कणसे, अथर्व गावंड, सलोनी आंबेरकर, मनस्वी कोळी, गौरी वायळ, जिया कोळी आदींचा गुणगौरव करण्यात आला.
शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेचा आलेख उंचावण्याचे आवाहन केले. उत्कर्ष पत्रकार समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाला गव्हाणचे उपसरपंच विजय घरत, विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंता ठाकूर व विश्वनाथ कोळी, ज्येष्ठ नेते जयवंत देशमुख, गव्हाण ग्रामपंचायतच्या सदस्या योगिता भगत, कामिनी कोळी, उषा देशमुख, सुनिता घरत यांच्यासह पत्रकार महिला संघाच्या अध्यक्षा डॉ. स्वाती पाटील व अन्य पदाधिकारी, विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रमोद मंडले, पर्यवेक्षिका विशाखा मोहिते, ‘रयत’चे लाईफ मेंबर व जनरल बॉडी सदस्य रवींद्र भोईर, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे आदी उपस्थित होते. विद्यालयाचे उपशिक्षक सागर रंधवे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply