Breaking News

भाजपचा विचार सर्वत्र पोहचवा

पाली येथे प्रदेश सदस्य राजेश मपारा यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

सुधागड ः रामप्रहर वृत्त
भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता एकमेकांना प्रोत्साहन देणारा आहे. भाजपचा विचार सर्वदूर पोहचविण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन भाजप महाराष्ट्र प्रदेश सदस्य राजेश मपारा यांनी केले. सुधागड तालुक्यातील पाली येथे मोदी ऽ 9 जनसंपर्क अभियानांतर्गत आयोजित तालुका, जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते.
या वेळी मपारा म्हणाले की, भाजप नावाचे छोटेसे रोपटे आता वटवृक्ष झाले आहे. भाजपचा वटवृक्ष करण्यामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे. ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी काम केले आणि आता त्याच पक्षाच्या माध्यमातून देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी आता सेवा, सुशासन, प्रगती आणि गरीबांचे कल्याण करीत आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपला मोठे करण्यासाठी आपल्या आयुष्याचे अनमोल क्षण वेचले. त्याच पक्षाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला मोठे करण्याचे काम अहोरात्र करीत आहेत. भाजपची ओळख नेहमीच कार्यकर्त्यांमुळे कायम राहिली आहे. इतर पक्षांसाठी त्यांचा परिवार हे सर्वस्व आहे. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी राष्ट्र हे त्याचा परिवार आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या भविष्याचा वेध घेत विचारमंथन करावे यासाठी आजचे तालुक्याची बैठक महत्त्वाची असल्याचे नमूद करीत, देशात विषारी विचार पेरण्याचे काम सुरू आहे. असे विषारी विचार पेरणार्‍या पक्षांना डबाबंद करण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा, असे आवाहन मपारा यांनी केले.
भाजप कार्यकर्त्यांमध्ये एकमेकाच्या एकजूटीतून हा संकल्प सामान्यांच्या घराघरापर्यंत पोहचावा. विकासाची मोठी जबाबदारी आपण सर्व पेलत आहोत. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक अशा सर्वच बाजूने आपला मतदारसंघ कसा विकास करेल यावर जोर द्यायचा आहे, असे मत भाजप नेत्या गीता पारलेचा यांनी व्यक्त केले.
या वेळी सुधागड तालुकाध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर, महिला मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैशाली मपारा, रमेश साळुंके, अभिजित चांदोरकर, आलाप मेहता यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply