पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयामध्ये गुरुवारी (दि. 10) पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमास अॅड. प्रशांत वाघमारे आणि अॅड. चेतन केणी हे प्रमुख उपस्थित होते. हे दोन्ही प्रमुख पाहुणे सीकेटी विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.
या कार्यक्रमांतर्गत पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या छोट्या विद्यार्थ्यांनी गाणी, वेशभूषा व भाषणे सादर केली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयात घेण्यात आलेल्या शालांतर्गत स्पर्धा, बाह्य स्पर्धा व रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात अॅड. चेतन केणी यांनी त्यांच्या बालपणीच्या शालेय जीवनातील काही आठवणी सांगितल्या व त्यांना घडवणार्या शिक्षकांबद्दल आदर असल्याचे सांगितले.
कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या अॅड. प्रशांत वाघमारे अॅड. चेतन केणी, सौ. कोटीयन, तसेच शिक्षक-पालक संघाचे सदस्य यांचे स्वागत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक सुभाष मानकर यांनी केले.