सुट्ट्या लागल्याने आणि लग्नसराई असल्याने खाजगी वाहनांना सोन्याचे दिवस आले आहेत. मात्र वाटेल ती किमंत सांगून प्रवाशांना लुटण्याचे काम सध्या खाजगी वाहतूक करणार्या चालकांकडून केले जात आहे. शिवाय अनेक गाड्या या विनापरवाना प्रवासी वाहतूक करत आहेत. या अवैध खाजगी प्रवासी वाहतुकीवर पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाचा मात्र सपशेल कानाडोळा होत आहे. असुरक्षित प्रवास आणि अवाजवी तिकीट तरीही लोकांचा खाजगी वाहतूकीकडे कल वाढत आहे. याला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे नियोजन जबाबदार आहे. अशाने लोकहिताची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था धोक्यात आली आहे.
राज्यात मे महिना सुरु झाल्यापासून लग्नसराई सुरु आहे. याकरिता चाकरमनी देखील गावाकडे एक दिवसाकरिता होईना पण येत आहेत. या प्रवाशांना ने आन करण्यासाठी महाराष्ट्र एस.टी.महामंडळ सज्ज आहे. मात्र प्रवासी खाजगी वाहनांकडे वेळेचे कारण पुढे करत वळत आहेत. याचा फायदा खाजगी वाहन चालकांना झाला असून राज्यात हि वाहने खुली आम वाहतूक करीत आहेत. या वाहनांना कोणतेही प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी नसली तरी वाटेल ते दर लावून सध्या प्रवासी वाहतूक केली जात आहे. या वाहनचालकांना पोलिसांचे पाठबळ असल्याने हे वाहन चालक आता एस.टी. महामंडळाच्या परिसरात वाहने आणून उभी करू लागले आहेत. एस.टी.महामंडळाकडे पुरेसा सुरक्षा कर्मचारी वर्ग नसल्याने आणि याठिकाणी पोलीस देखील नसल्याने हि प्रवासी वाहतूक जोमाने सुरु आहे. उदाहरणार्थ महाड ते पनवेल वाहतूक करणार्या छोट्या वाहनचालकांकडून सध्या प्रवाशांची लुट सूरु आहे. महाड ते पनवेल असे भाडे जवळपास 400 रुपये आकारले जात आहे. एस.टी.चे तिकीट दर या प्रवासाकरिता निम्मे आहे. तसेच या वाहनावर कामकरणार चालक हे कुशल नसतात, नशा करुन गाडी चालविने, वाहनांचा इंशुरन्स नसने, टायर आणि वाहनांची स्थिती व्यवस्थित नसणे, अशा धोकाअःआय परस्थितीत ही खाजगी वाहतूक प्रवासींची वाहतूक करत असते. या वाहनांना होणार अपघातात प्रवाशांना मोठ्याप्रमाणात नाहक प्राण गमवावे लागत आहेत.
जन सुखाय जन हिताय सेवा देणारी एसटी गेली साठ वर्षे विना तक्रार आपली सेवा देत आहे. एकेकाळी महाराष्ट्र शासनाचा फायद्यात चालेला हा अंगिकृत व्यवसाय बदलत्या आधुनिक काळात तोट्यात का सुरु आहे. याच आकलण करताना कोणच दिसत नाही. कामगार आणि कर्मचारी
केवळ पगारासाठी काम करीत आहेत. अधिकारी हि सेवा नसुन आपली दुभती गाय आहे असे समजुन या व्यवस्थेला लुटत आहेत. तर मंत्र्याना या कडे लक्ष द्यायला वेळच नाही. भाजपा सरकारच्या काळात याच एसटीला चांगले दिवस आले आहेत. सेमी च्या दरात शिवशाही ही वाताणुकुलीत बस सेवा सुरु झाली आणि एसटीच चित्रच पालटल. तीचती लाल डब्याची जागा आता गारेगार रंगीबेरंगी बसने घेतली आणि तेही गरीबांना परवडणार्या दरात. जेष्ठांना आणि अपंगानाही ही शिवशाही आपल्यासोबत घेवुन जावु लागली. वाट पाहिन पण शिवशाहीनेच जाईन अस आता प्रवासी म्हणू लागले. पण हे स्वप्न ठरु नये हीच भावना प्रवाशांची आहे. महाराष्ट्राची लाईफलाईन समजल्या जाणार्या या एसटीला टीकविण्याची आणि फायद्यात आणुन देण्याची जबाबदारी जशी एसटी कर्मचार्यांची आहे तशीच ती प्रवाशांची ही आहे. ही बस आपली आहे या भावनेने प्रवाशांनी प्रवास केल्यास बस स्वच्छ आणि टापटीप राहतील. तर कर्मचार्यांनी ही आपली रोजीरोटी आणि आपल कुटुंब समजुन तीची सेवा केली तर एसटी नक्कीच फायद्यात येईल यात शंका नाही.
-महेश शिंदे