रोहे : प्रतिनिधी
ओबीसींच्या न्याय्य हक्कासाठी लढा चालू आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित होणार आहे, मात्र राजकीय पक्षांनी प्रतिनिधीत्व देताना बहुसंख्येने असलेल्या ओबीसींचा प्राधान्याने विचार करावा, असे प्रतिपादन ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी रविवारी (दि. 24) माणगाव येथे केले. ओबीसी संघर्ष समन्वय समिती तथा ओबीसी जनमोर्चाची जिल्हा कार्यकारिणी निवडण्यासाठी माणगाव येथील कुणबी भवनात रविवारी आयोजित केलेल्या सभेत चंद्रकांत बावकर बोलत होते. ओबीसी समाज बांधवांनी संघटीत होवून काम करणे आवश्यक असल्याचे ओबीसी जनमोर्चाचे उपाध्यक्ष जे. डी. तांडेल यांनी सांगितले. सरचिटणीस अरविंद डाफळे, चिटणीस कृष्णा वणेे, अशोक पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी ओबीसी जनमोर्चाच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी सुरेश मगर यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी प्रदुम ढसाळ, सी. एम. ठाकूर, सुदाम शिंदे यांची निवड झाली. सरचिटणीसपदी अशोक पाटील, चिटणीसपदी रोशन पाटील व महादेव पाटील यांची निवड झाली. कार्यकारिणी सदस्यांत भास्कर पवार, अरुण चाळके, राजेंद्र खाडे, सचिन कदम, कृष्णा खांडेकर, महादेव सरसंबे, अॅड. रुपेश पाटील, रवींद्र मांडावकर, रामचंद्र सकपाळ, अनंत खराडे, रत्नाकर लंबाडे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र खाडे यांनी केले. ओबीसी जनमोर्चाचे जिल्हा समन्वयक उदय कटे, माणगाव तालुका अध्यक्ष अरुण चाळके, अॅड. मनोजकुमार शिंदे, शिवराम महाबळे, तळा तालुका अध्यक्ष सचिन कदम, सुभाष भोनकर, सरचिटणीस राजेंद्र खाडे, अॅड. मंगेश हुमणे, रोहा सरचिटणीस महादेव सरसंबे, माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, अनिल नवगणे, जिप माजी सदस्य रमेश मोरे, माजी उपसभापती रामा सकपाळ, यांच्यासह जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper