Breaking News

आपटा येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती; ग्रामस्थांनी मानले आभार

पनवेल ः रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या अल्पसंख्याक विकास निधी अंतर्गत आपटा ग्रुपग्रामपंचायत येथील विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा रविवारी (दि. 27) उत्साहात झाला. या वेळी ग्रामस्थांच्या वतीने आमदार महेश बालदी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले व विकासकामांबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.
या विविध विकासकामांच्या शुभारंभाच्या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, केळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष विद्याधर जोशी, आपटाचे सरपंच नजनिन पटेल, माजी सरपंच दत्ता पाटील, कराडे खूर्दचे माजी सरपंच विजय मुरकुटे, ताराचे उद्योगपती बाळूशेठ पाटील, भाजप नेते गणेश पाटील, साईचे माजी सरपंच विद्याधर मोकल,
शिरढोणचे माजी उपसरपंच जगदीश चौधरी, ग्रामपंचायत सदस्य असद पिठू, संतोष शिंगाडे, सामाजिक कार्यकतर्रे रत्नाकर घरत, कृष्णा वाघे, दत्ता भोईर, केळवणे पंचायत समिती युवा मोर्चा अध्यक्ष सुशील ठाकूर, धर्मेंद्र भोईर, विलास ठाकूर, पांडुरंग पाटील, दस्तगीर पिठू फैसल, पिठू सिराज काझी, बशीर मुल्ला, नासिर मुल्ला, साजिद मुल्ला, नादिर मुल्ला, फैज बुबेरे, अल्तमश मुल्ला, तास्किर मुल्ला, अर्सलान दळवी, खालिद पिठू, फरहान पिठू, झिशान नवीद जलगावकर, खलील मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील, ताराचे दिनेश पाटील, ज्ञानेश्वर भोईर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. सुमारे 35 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये आपटा मोहल्ला येथील रस्ते काँक्रीटीकरण करणे (20 लाख रुपये), मस्जिद ते बाजारपेठकडे जाणारा रस्ता काँक्रेटीकरण करणे (10 लाख रुपये), दर्गाकडे जाणारा रस्ता काँक्रेटीकरण करणे (पाच लाख रुपये), आपटा सारसई बागेचीवाडी (आदर्शवाडी) घरकुलचे भूमिपूजन करण्यात आले.

Check Also

25 एकांकिका राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य …

Leave a Reply