Breaking News

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इन्व्हेस्टिचर सेरेमनी उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत इन्व्हेस्टिचर सेरेमनी शनिवारी (दि. 26) मोठ्या उत्साहात झाली. या वेळी यशस्वी विद्यार्थी तसेच शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला.
दरवर्षी 7 ऑगस्ट हा रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा वर्धापन दिन मान्यवर व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत इन्व्हेस्टिचर सेरेमनी म्हणून साजरा केला जातो. या वर्षी अतिवृष्टीमुळे हा कार्यक्रम त्या दिवशी न घेता रविवारी दिमाखात झाला. ही शाळा खारघर पनवेलसह नवी मुंबई परिसरात सीबीएसई बोर्डाची एक नामांकित शाळा म्हणून नावारूपास आलेली आहे. या शाळेचे विद्यार्थी आज जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी आयआयटी, एमबीबीएस, एलएलबी, बीटेकचे शिक्षण घेत आहेत. वर्धापन दिनी शाळेतून निवडलेले विद्यार्थी प्रतिनिधी (कौन्सिल मेंबर्स) शपथ घेतात.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या समूह गायनाने झाली. यानंतर आदित्य ठाकूर याने संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याबद्दल परिचय करून दिला, तर त्याच्यासह हेड बॉय अभिमन्यू कृष्णराज, असिस्टंट हेड बॉय अपूर्व ठाकूर, हेड गर्ल मन्नत ठाकूर, असिस्टंट हेड गर्ल अनुष्का जाधव यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर व व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार घालून सन्मान केला.
या कार्यक्रमास संस्थेच्या संचालक शकुंतला ठाकूर, परेश ठाकूर, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, अमोघ ठाकूर, भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक प्रवीण पाटील, नेत्रा पाटील, तळोजा विभाग अध्यक्ष प्रभाकर जोशी, मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर, (सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल, उलवे) मुख्याध्यापक अविनाश कुलकर्णी (लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल, कामोठे) यांची उपस्थिती होती. सर्वांचे मुख्याध्यपिका राज अलोनी यांनी देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात वेगवेगळ्या राज्यांमधील लोकनृत्ये सादर केली.
शैक्षणिक वर्ष 2022-23मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीच्या शालांत परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा या वेळी चषक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन या वेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना घडवणार्‍या शिक्षकांचासुद्धा असाच सत्कार करण्यात आला, तर शाळेच्या उत्तुंग यशामध्ये मोलाचा वाटा असणार्‍या मुख्याध्यापिका राज अलोनी यांचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम युट्युब लाईव्ह दाखवण्यात आला. त्यामुळे अनेकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply