Breaking News

महिला टी-20 वर्ल्डकप फायनलला पाऊस पडल्यास…

मेलबर्न : वृत्तसंस्था

महिला टी-20 वर्ल्डकपचा  विजेता होणार याची सर्वांना आता उत्सुकता लागली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये येत्या रविवारी (दि. 8) फायनल रंगणार आहे, पण उपांत्य फेरीप्रमाणे अंतिम सामन्यावरही पावसाचे सावट आहे. पाऊस पडला, तर कोण विजेता होणार, हा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे.जर विश्वविजेता ठरवायचा असेल तर किमान 10 षटकांचा खेळ होणे क्रमप्राप्त असेल. जर 10 षटकांचा खेळ होत नसेल, तर हा सामना रद्द केला जाऊ शकतो. फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जर 8 मार्चला सामना होऊ शकला नाही, तर हा सामना 9 मार्चला (सोमवारी) खेळवला जाऊ शकतो, पण जर सोमवारीही सामना झाला नाही, तर फायनलमध्ये पोहोचलेल्या दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेतेपद देण्यात येऊ शकते.

Check Also

निसर्गाच्या सानिध्यात धोदाणी ते माथेरान इको-फ्रेंडली ट्रेक

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तनिसर्गरम्य डोंगररांगा, हिरवाईने नटलेला परिसर, …

Leave a Reply