Breaking News

उरण तालुक्याचा शासनाच्या डोंगरी विकास योजनेत समावेश

आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश

उरण : रामप्रहर वत्त
उरण तालुक्याचा शासनाच्या डोंगरी विकास योजनेत समावेश करण्यात आला असून आमदार महेश बालदी यांनी केलेल्या मागणी व पाठपुराव्याला यश आले आहे.
उरण विधानसभा मतदारसंघातील खालापूर व पनवेल तालुक्याचा समावेश डोंगरी विकास योजनेत समावेश आहे, पण उरण तालुक्याचा समावेश नसल्याने शासनाचा डोंगरी विकास योजनेचा निधी खर्च करता येत नव्हता. त्यामुळे उरण तालुक्याचा डोंगरी विकास योजनेत समावेश करण्याची मागणी आणि पाठपुरावा आमदार महेश बालदी यांनी शासनदरबारी केला. त्या अनुषंगाने उरण तालुक्याचा समावेश करण्यात आला असून तसा शासन निर्णय जारी झाला आहे.
या निर्णयामुळे आता आवरे, जासई, कंठवली, दिघोडे, कोप्रोली, केगाव, बोरीनखाडी, चाणजे, म्हातवली, सारडे, रानसई, नागाव, चिर्ले, पुनाडे, कळंबुसरे, कडापे, चिरनेर, वेश्वी, पाले, घारापुरी इतर गावांचा समावेश डोंगरी विकास योजनेच्या उपगटात होणार आहे. या गावातील विविध विकासकामांकरिता निधी मिळणार असल्याने ग्रामस्थांनी आमदार महेश बालदी यांचे आभार मानले आहेत.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply