Breaking News

पतंग महोत्सवातून मकरसंक्रात सणाचा आनंद द्विगुणित

पनवेल : रामप्रहर वृत्त
मकरसंक्रांत सणाच्या औचित्याने पनवेलमधील सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने नमो उत्सव अंतर्गत सोसायटीच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या पतंग महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लहान मुले, युवक आणि महिलांनीही पतंग उडवण्याचा आनंद घेतला. लहान मुला-मुलींसाठी विशेष पतंग उपलब्ध करून देण्यात आले होते. आकाशात भरारी घेणाऱ्या पतंगाची जणू स्पर्धाच सुरू होती. या वेळी सेल्फी पॉइंट, लाईव्ह म्युझिकचाही आनंद उपस्थितांनी घेतला. सायंकाळी आकाश दिवे गगनात सोडून या महोत्सवाचा आनंद आणखी वाढला होता.
मकरसंक्रांती हा सण सूर्य देवाला समर्पित असतो. या सणाला खगोलशास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे सरकतो. मकर संक्रांतीपासूनच ऋतू बदलण्यास सुरुवात होते.देशभरात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्या अनुषंगाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते
या महोत्सवाला प्रमुख मान्यवर म्हणून शकुंतला ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, उपाध्यक्ष जयंत पगडे, उद्योजक राजू गुप्ते, भाजप शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी उपमहापौर चारुशीला घरत, जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, शहर चिटणीस अमित ओझे, टीआयपीएलचे संचालक अमोघ ठाकूर, भाजपचे शहर उपाध्यक्ष केदार भगत, माजी नगरसेवक अजय बहिरा, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष राजेश्री वावेकर, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, प्रीतम म्हात्रे, प्रशांत पोतदार, प्रशांत झुंजारराव, स्वप्नील ठाकूर यांची उपस्थिती लाभली. या वेळी महोत्सवाचे आयोजक सुमित झुंजारराव, रोशन ठाकूर, प्रवीण मोरबाळे, अमेय देशमुख, आदित्य देशमुख, संदीप पाटील, संतोष कुंवर, स्वरूप वाणी यांच्यासह लहानग्यांपासून ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या वेळी उपस्थित सर्वानी महोत्सवाचा आनंद घेत एकमेकांना मकरसंक्रातीच्या शुभेच्छाही दिल्या.

Check Also

भिंगारी संघाने जिंकला नमो क्रिकेट चषक

पनवेल : रामप्रहर वृत्तनमो चषक 2025 अंतर्गत खारघर येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भिंगारी …

Leave a Reply