Breaking News

शामेलियन सरड्याला जीवदान

बच्चेकंपनीने कावळ्यांच्या तावडीतून केली सुटका

उरण : वार्ताहर

कावळ्यांच्या तावडीत सापडलेल्या दुर्मीळ अशा शामेलियन जातीच्या सरड्याची बच्चेकंपनीने सुटका करून त्याला जीवदान दिले  आहे. चिरनेर येथील आयुष भगत, दक्ष भगत, हर्दिका गोंधळी, स्मीत गोंधळी हे अंगणात खेळत असताना त्यांना कावळ्यांचा गोंगाट ऐकू आला म्हणून ते पहाण्यासाठी गेले असता त्यांना एक विचित्र प्रकारचा हिरव्या रंगाचा सरडा दिसला. विजेच्या एका सर्व्हीस वायरवर हा सरडा होता आणि त्याच्या भोवताली कावळे त्याला मारण्यासाठी प्रयत्न करत होते.  सुरूवातील या बच्चेकंपनीला त्या प्राण्याची भिती वाटली, मात्र काही वेळाने कावळ्यांना हुसकावून त्यांनी एका काठीच्या आधारे त्याला खाली उतरवले. त्याला काही वेळ पिंजर्‍यात ठेवून त्याला पाणी आणि खाद्य दिले. त्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात जंगलांत सोडण्यात आले. काही दिवसांपूर्वी याच बच्चेकंपनीने एका घुबडाला अशाच प्रकारे कावळ्यांच्या तावडीतून सोडविले होते. बच्चेकंपनीचा या प्राण्यांबद्दल असणार्‍या प्रेमाबद्दल सर्वांनाच या मुलांचे कौतूक वाटत आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply