रिक्षा, टॅक्सी चालक मालक आणि परिवाराने घेतला लाभ
पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष पनवेल शहर व तालुका आणि वंदे मातरम जनरल कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त रिक्षा व टॅक्सी चालक मालक आणि त्यांच्या परिवारासाठी मोफत आरोग्य शिबिर रविवारी (दि. 23) आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. चारशे जणांनी या शिबिराचा लाभ घेतला.
पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या शिबिराच्या उद्घाटन समारंभास भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, वंदे मातरम कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, उपाध्यक्ष रवी नाईक, माजी नगरसेवक नितीन पाटील, अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, वर्षा नाईक, वंदे मातरम संघटनेचे सरचिटणीस मोतीलाल कोळी, छाया तळेले, सुनिता रावले, रवींद्र कोरडे, पांडुरंग पाटील, दीपक खोत, महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष अरुणा पाटील, निलेश वांगिलकर, विश्वनाथ गडगे, दीपक नावडेकर, अंकुश पाटील, जगदीश पाटील, त्रिशूल दिघोडकर, गणेश पाटील, कल्पेश पाटील, उमेश पाटील, विनायक पाटील, दत्ता भोपी, सुबोध म्हस्कर, शर्मिला गडगे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते, तर महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शिबिरास सदिच्छा भेट दिली.
या शिबिरात डोळ्यांची तपासणी, हृदयाची तपासणी, कॅन्सर तपासणी, दातांची तपासणी, शुगर तपासणी, बोन मिनिरल डेन्सिटी, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. याचा रिक्षा व टॅक्सी चालक मालक आणि त्यांच्या परिवाराने लाभ घेतला.