Breaking News

सॅनिटायझर, हॅण्डवॉशसाठी निवेदन

पाली ः प्रतिनिधी

कोरोनाचा धोका सतत वाढतच चालला आहे. त्यामुळे चिंचोटी ग्रामपंचायत हद्दीत येणार्‍या चिंचोटी, दिविपारंगी, फणसापूर, बापळे गावांतील प्रत्येक घरात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सॅनिटायझर व हॅण्डवॉशचा पुरवठा तत्काळ उपलब्ध करून देण्यासंदर्भातील निवेदन सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. राकेश पाटील यांनी चिंचोटी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक धुमाळ यांच्याकडे दिले. या वेळी प्रमोद वाजंत्री, बाळकृष्ण पाटील आदी उपस्थित होते. चिंचोटी ग्रामपंचायतीतील सर्व गावांत निर्जंतुकीकरण करण्यासाठीची फवारणी केली आहे. अ‍ॅड. राकेश पाटील यांनी सॅनिटायझर व हॅण्डवॉश देण्याबाबत सरपंच व सदस्यांबरोबर चर्चा करून ते उपलब्ध करून देऊ, असे ग्रामसेविका धुमाळ यांनी सांगितले आहे.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply