Breaking News

महायुतीचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांना आणखी दोन संघटनांचा पाठिंबा

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांना विविध संघटनांकडून पाठिंबा लाभत आहे. यात आणखी दोन संघटनांची भर पडली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग (जि.प., न.पा., मनपा) संघटना आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने आपले पाठिंबा पत्र आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आमदार निरंजन डावखरे यांना रविवारी (दि. 23) दिले.
पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पाठिंबा पत्रे सुपूर्द करतेवेळी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू, परिषदेच्या प्राथमिक विभागाचे अध्यक्ष मधुकर उन्हाळे, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष फुलावरे, प्राथमिक शिक्षकांच्या पतपेढीचे अलिबाग अध्यक्ष निलेश घरत, संजय भगत यांच्यासह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. कडू यांच्या माध्यमातून आमदार डावखरे यांना हे समर्थन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग (जि.प., न.पा., मनपा) संघटननेने आमदार निरंजन डावखरे यांना दिलेल्या पाठिंबा पत्रात म्हटले आहे की, आपण यापूूर्वी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघावर निवडून गेलेले असून विधान परिषदेत पदवीधर शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून न्याय दिला होता. यंदाच्या निवडणुकीत आपण पुन्हा एकदा उमेदवारी लढवत आहात. यासाठी आम्ही आपणांस बिनशर्त पाठिंबा देत आहोत. कोकण विभागातील शिक्षक परिषद पदाधिकारी, हितचिंतकांना याद्वारे जाहीर आवाहन करण्यात येते की, आमदार निरंजन डावखरे यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने दिलेल्या पाठिंबा पत्रात नमूद केले आहे की, आपण आपले जुन्या पेन्शन लढासंदर्भातील प्राधान्य देण्याबाबतचे आश्वासन लक्षात घेता संघटनेच्या वतीने कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आपल्या उमेदवारीला सक्रिय पाठिंबा आणि समर्थन जाहीर करीत आहेत. संघटनेच्या शिलेदारांनी जुन्या पेन्शनच्या लढ्याला पाठबळ मिळण्यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांचा प्रचार आणि प्रसारासाठी सक्रिय राहावे.

Check Also

पनवेलच्या आकुर्लीत घंटागाडीचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील आकुर्ली ग्रामपंचायतीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा परिषद शेष …

Leave a Reply