Breaking News

पनवेलमध्ये विकासकामे सुरूच; गटार बांधकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिका तसेच सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामार्फत पनवेल शहरासह विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामे केली जात आहेेत. त्या अंतर्गत प्रभाग क्रमांक 19च्या नगरसेविका दर्शना भोईर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गटाराचे बांधकाम करण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

पनवेल महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 19मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन ते गुणे हॉस्पिटलदरम्यान गटाराचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या भूमिपूजनावेळी नगरसेवक राजू सोनी, अनिल भगत, नगरसेविका मुग्धा लोंढे, तसेच डॉ. गिरीश गुणे, पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील, भाजप महिला मोर्चाच्या सुहासिनी केकाणे आदी उपस्थित होते.

Check Also

युवा नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत हेल्मेट वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्तभाजपचे युवा नेते, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक परेश …

Leave a Reply