नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेचा रायगड विभाग अव्वल राहिला पाहिजे, असे प्रतिपादन संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वाशी येथे बोलताना व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागातील मुख्याध्यापकांची सहविचार सभा नवी मुंबईतील वाशी येथील मॉर्डन स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत होते. त्यांनी दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या सभेस संस्थेचे रायगड विभागीय निरीक्षक आर.पी. ठाकूर, सहाय्यक निरीक्षक शहाजी फडतरे, मॉडर्न स्कूलच्या प्राचार्य सुमित्रा भोसले यांच्यासह पदाधिकारी, सदस्य, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
सभेत विद्यालयाचे शैक्षणिक कामकाज कसे असावे, विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता कशी वाढविली गेली पाहिजे या विविध विषयांवर उपस्थित मान्यवरांनी मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …