मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तांबाटी (ता. खालापूर) आदिवासीवाडीच्या पुनर्वसनाची औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागणी केली.
रायगड जिल्ह्यात असलेल्या खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये टाटा कॅन्सर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरसाठी शासनाच्या माध्यमातून 25 एकर जागा देण्यात आली आहे. एक चांगला प्रकल्प या ठिकाणी होत आहे, मात्र या ठिकाणी असलेल्या आदिवासी बांधवांची घरे त्या ठिकाणाहून शासन काढून टाकत आहे तसेच तांबाटी ग्रामस्थांचे शेतीकडे ये-जा करणारे रस्तेसुद्धा बंद होणार आहेत. त्यामुळे त्यांना पर्यायी मार्ग तयार करून देणे आवश्यक असून आदिवासी बांधवांच्या घरांचे प्रथम पुनर्वसन करावे, अशी मागणी करीत त्यासाठीचे शासनाला निर्देश देण्यात यावे, अशी मागणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत केली.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …