Breaking News

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची जेएनपीएला भेट

विविध प्रकल्पांचे उद्घाटन

उरण : प्रतिनिधी, बातमीदार
केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी व जलमार्गमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर जेएनपीएला गुरुवारी (दि. 22) भेट दिली. या भेटीत त्यांच्या हस्ते जेएनपीए परिसरातील तीन सरोवरांच्या सौंदर्यवर्धन व पुनरूप जीवन प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. या दरम्यान त्यांनी बंदरातील विविध पायाभूत सुविधा व विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे हेही उपस्थित होते.
जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेश शरद वाघ यांनी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे स्वागत केले. जेएपनीच्या पर्यावरणीय शाश्वतेच्या प्रतिबद्धतेवर प्रकाश टाकत मंत्रीमहोदयांनी बंदराच्या परिसरातील तीन महत्त्वपूर्ण जलाशयांचे उद्घाटन केले. यामध्ये प्रशासन इमारत पायथ्याचे सरोवर आणि सीपीपी सरोवरांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी जसखार सरोवराचेही भूमिपूजन केले. या सरोवरांना महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, आणि संत नामदेव महाराज या महान संतांच्या नावाने ओळखले जाते.
स्मार्ट सेझ प्रकल्पाचे भूमिपूजनदेखील मंत्री सोनोवाल त्यांच्या हस्ते करण्यात आला. परिसरातील घुसखोरी टाळणे, वाहनांच्या शिस्तबद्ध हालचाली सुनिश्चित करणे, प्रवेशदारांचे ऑपरेशन सुकर करणे, सर्व कर्मचारी व वाहनांच्या आगमन-निगमन वेळेचे निरीक्षण करणे, एलएएन वापरकर्त्यांसाठी सर्व युटीलिटी इमारतींना नेटवर्क कनेक्टिव्हिटी प्रदान करणे तसेच ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली, स्मार्ट जल व्यवस्थापन, स्मार्ट स्ट्रीट लायटिंग, स्मार्ट पार्किंग आणि वेट ब्रिजेस यासारख्या भविष्यातील अनुप्रयोगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा प्रदान करणे अशी ही या प्रकल्पाची उद्दिष्ट आहेत.
या वेळी मंत्री सोनेवाल यांनी प्राधिकरण सेझ येथे एक झाड आईच्या नावे या उपक्रमांंतर्गत एका रोपट्याचे रोपण केले. त्यानंतर त्यांनी जनहित प्राधिकरणाच्या भेटीदरम्यान सेझ वटहुकूमधारकांना पत्र जारी केले. जेएनपीएने सात टप्प्यात भूखंडाचे वाटप केले आहे. फेज 7मध्ये 57 एकरांसाठी अलीकडेच झालेल्या ई-लिलावाला उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला आहे, ज्यामध्ये 21 बोलीदारांनी सहा युनिट प्लांट्स आणि तीन सहविकासक प्लांट्ससाठी बोली सादर केल्या. विशेष म्हणजे राखीव किमतीपेक्षा एकूण 95.23 टक्के कोट केलेल्या मूल्यांमध्ये वाढ झाली. ज्यामुळे प्राधिकरणासाठी राखीव किमतीपेक्षा 63 टक्के जास्त महसूल वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2023-24मध्ये सेझने 8049 टीईयुएससहित एकूण 15 हजार कोटी रुपयांचा आयात निर्यात व्यापार निर्माण केला आहे. यात मागील वर्षीच्या तुलनेत 300 टक्के वाढ झाली आहे.
या वेळी केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. यात प्राधिकरण वाढवण बंदर आणि आरइसी यांच्यात विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना समर्थन देण्यास कर्ज वितरणासाठी आणि गेटवे टर्मिनल्स इंडिया जीटीआय आणि जेएनपीए यांच्या जहाजांना तटीय वीजपुरवठा कार्यान्वित करण्यासाठी या करारांद्वारे पर्यावरणीय शाश्वत बंदर संचलनासाठीच्या समर्पणावर जोर दिला जात आहे.
स्थानिक समुदायाला अधिक सशक्त बनविण्यासाठी आणि कार्यबल विकास वाढविण्यासाठी मंत्री सोनोवाल यांनी जेएनपीएद्वारे विकसित वाढवण स्केलिंग प्रोग्रॅमच्या व्हॉट्सअ‍ॅप चार्ट बोर्डचे उद्घाटन केले. केंद्रीय कॅबिनेटने नुकतीच मान्यता दिलेल्या वाढवण बंदर प्रकल्पामुळे सुमारे 10 लाख रोजगाराची संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. एकंदरीत प्राधिकरण राष्ट्रीय आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी, व्यापार सुलभ करण्यासाठी, आणि जागतिक पुरवठा साखळींमध्ये आपली भूमिका मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे.
दरम्यान, जेएनपीच्या नूतनीकरण केलेल्या अतिथीगृहाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आमदार महेश बालदी उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply