खोपोली : प्रतिनिधी
मुंबई-पुणे महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ गुरुवारी (दि. 11) सायंकाळी भरधाव वेगाने जाणार्या बसने अज्ञात ट्रकला धडल दिली. या अपघातात एक महिला प्रवासी किरकोळ जखमी झाली असून, त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. सुदैवाने बसमधील अन्य प्रवासी बचावले आहेत. मुंबईकडे भरधाव वेगात चाललेल्या बसचा आडोशी बोगद्याजवळ ब्रेक निकामी झाल्याने बस अज्ञात ट्रकला जाऊन धडकली. गुरूवारी सायंकाळी 4.15 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात नीरज कौर (वय 34, रा. राजस्थान) या महिलेच्या डोक्याला किरकोळ जखमी झाली. तिला त्वरित खंडाळा येथील रुग्णालयात नेण्यात आलेे. दैव बलवत्तर म्हणून बसमधील 30ते 35प्रवासी प्रवास सुखरूप बचावले. मात्र या अपघातात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताचे वृत्त समजताच डेल्टा फोर्स, महामार्ग पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी जावून, काही प्रमाणात झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली