लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पुण्यातील भामचंद्र डोंगर वासोली येथे नुकतेच के.एस. वॉरियर्स ऑल स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या पनवेल खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धा के.एस. वॉरियर्स ऑल स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक कीर्ती पाटील, सचिव श्री. पाटील तसेच आशिष डोईफोडे यांच्याद्वारे आयोजित केली गेली होती. या स्पर्धेत सीकेटी महाविद्यालयातील मार्शल आर्ट्स अॅक्टिव्हिटीमधील 46 खेळाडूंनी प्रशिक्षक भूपेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेत पाच सुवर्ण, 12 रौप्य आणि 28 कांस्यपदक आणि सोबतच पहिली बिग चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकावली. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.