Breaking News

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त
आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्यातून साकारलेल्या उलवे पोलीस ठाण्याचे उद्घाटन सोमवारी (दि. 14) नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आमदार महेश बालदी यांनी, नव्याने सुरू झालेल्या उलवे पोलीस ठाण्यामुळे येथील नागरिकांना न्याय मिळेल, असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, सहपोलीस आयुक्त संजय येनपुरे, पनवेल परिमंडळाचे उपायुक्त प्रशांत मोहिते, शेवा बंदर विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. विशाल नेहूल, न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अंजुम बागवान, न्हावे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, गव्हाणचे माजी उपसरपंच विजय घरत, वहाळचे माजी उपसरपंच अमर म्हात्रे, माजी ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, जयवंत देशमुख, हेमंत ठाकूर, तंटामुक्ती अध्यक्ष उत्तम कोळी, किशोर घरत, निलेश खारकर, धीरज ओवळेकर, वितेश म्हात्रे, दीपक गोंधळी, स्वप्नील म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे. एकूण 20 पोलीस ठाणी असलेल्या या आयुक्तालय हद्दीत उलवे पोलीस ठाण्याच्या रूपाने एका पोलीस ठाण्याची वाढ झाली असून आता नवी मुंबईतील पोलीस ठाण्यांची संख्या 21वर पोहचली आहे.
उलवे नोडमध्ये मागील सहा-सात वर्षात नागरीकरणामध्ये सातत्याने होणारी लक्षणीय वाढ लक्षात घेता येथे पोलीस ठाण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. यासाठी आमदार महेश बालदी यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून उलवे पोलीस ठाणे कार्यान्वित झाले आहे.
या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी लवकरच उलवे पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply